Sadi Yojana कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत रेशन कार्डधारक महिलांना मिळणार मोफत साडी

Sadi Yojana या लेख मधील माहिती वाचून तुम्हाला ही माहिती खोटी वाटेल परंतु ही बातमी खरोखरच खरी आहे.शासनाकडून नुकतीच घोषित करण्यात आलेल्या योजनेचे नाव मोफत साडी योजना आहे. या मोफत साडी योजना लाच कॅप्टिव्ह मार्केट योजना या नावाने देखील ओळखले जाते.

महिलांना रेशन धान्यासोबत शासनाकडून पाच वर्षासाठी साडी मोफत दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी महिलांना एक साडी मिळणार आहे याप्रमाणे पाच वर्षासाठी पाच साड्या वाटप केल्या जाणार आहेत. मोफत साडी योजनेची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आणि शासन निर्णय पाहण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

 

Sadi Yojana नवीन आलेल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांना वस्त्रोद्योग विभागाकडून यंत्रमागावर विणलेली एक साडी मोफत वाटप करण्याचे ठरवले आहे. नवीन शासन निर्णय 2 जून 2023 रोजी आलेला आहे या शासन निर्णयानुसार “एकात्मिक व शाश्वत वस्त्र उद्योग धोरण 2023- 28” जाहीर करण्यात आला.

 

योजनेचे नाव कॅप्टन मार्केट योजना आहे आणि ही योजना महाराष्ट्र शासन मार्फत सुरू करण्यात आलेली आहे. ही नवीन योजना नोव्हेंबर 2023 पासून चालू करण्यात आली आहे. 2023 ते 2028 हा या योजनेचा कालावधी आहे. म्हणजेच ही योजना पाच वर्षापर्यंत चालू राहणार आहे. या योजनेचा लाभ अंत्योदय रेशनकार्डधारक यांना मिळणार आहे.

 

शासन निर्णय येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top